दररोजप्रमाणे सकाळी घरात धावपळ करून ऑफिसमध्ये आले. सवयीनुसार फेसबुक उघडले. कलीगशी डिस्कशन केल्याशिवाय काम पुढे जाणार नव्हते आणि तो आला नव्हता. त्यामुळे हातात रिकामा वेळ होता. फेसबुकवर रेंगाळायाला सुरवात झाली. रेंगाळणे हे क्रियापद वापरायचे कारण म्हणजे कोणताही माणूस काही विशेष उद्देशाने फेसबुक उघडत असेल असे मला नाही वाटत. कोणाची वाट पाहत असू किंवा एखाद्या शोला भरपूर वेळ उरला असेल तर जसे आपण जवळपासच्या रस्त्यावर रेंगाळत बसतो तसेच फेसबुकचे मला वाटते. रेंगाळताना कोणी भेटले, किंवा काही आवडीचे सापडले तर ठीकच नाहीतर हात-पाय हलवण्याची खरोखर वेळ यायची वाट पाहत इकडे तिकडे बघत बसायचे नुसते. असो असेच रेंगाळत असताना मला 'कहाँ से आए बदरा' ह्या गाण्याची लिंक मिळाली. फेसबुकवर रेंगाळणे बंद होवून एक से एक सुंदर अशा गाण्यांच्या दुनियेकडे पावले वळली. अर्थात ह्याही प्रवासात यु-ट्यूबची साथ मिळाली. यू-ट्यूबवर येत जाणार्या सजेशन्समुळे सध्या चालू असलेल्या गाण्याच्या ढंगाची गाणी एका पाठोपाठ एक मिळत गेली न कलीग येईस्तोवारचा वेळ तर एकदम मस्त गेलाच, मूड फ्रेश झाला आणि शिवाय नंतरही कामे करताना मध्ये ब्रेक घेतले त्यात छान छान गाणी ऐकायला मिळाली. प्ले केलेले प्रत्येक गाणे हे माझ्या इतके आवडीचे होते की मी लिस्ट करत गेले आणि एक छोटीशी गाण्यांची प्ले-लिस्ट तयार झाली. ती अशी:
कहाँ से आए बदरा (चश्म-ए-बद्दूर)
तू जो मेरे सुर में (चितचोर)
ना जाने क्यों, होता है यूँ जिंदगी के साथ (छोटीसी बात)
रिम-झिम गिरे सावन (मंज़िल)
तेरे बिना जिया जाये ना (घर)
तुम्हे हो ना हो (घरोंदा)
दो दीवाने शहर में (घरोंदा)
गोरी तेरा गांव बड़ा प्यारा (चितचोर)
आने वाला पल (गोलमाल)
उठे सबके कदम (बातों बातों में)
थोडा है थोड़े की ज़रूरत है (खट्टा मीठा)
ना बोले तुम ना मैंने कुछ कहा (बातों बातों में)
कहते सुनते बातों बातों में प्यार हो जायेगा (बातों बातों में)
लिस्ट हरवून जायला नको म्हणून ब्लॉगवर लिहून ठेवायचे ठरवले. ज्यांना ही गाणी आवडत असतील त्यांनी एखादे गाणे यु-ट्यूबवर लावले की पुढची गाणी आपोआप मिळत जातील.
ह्या सगळ्या गाण्यांमध्ये मला आवडते अशी गोष्ट ही की ती गाणी खूप साधी-सरळ आहेत. अर्थात नीट पाहायला गेले तर ती म्हणायला कठीण आहेत. पण त्यांचे शब्द असे आहेत की आपल्या दैनंदिन जीवनातील विचार-घटनाच ते कथन करत आहेत की काय असे वाटते. पिक्चरायझेषन पहिले तर आपल्यासारखीच मध्यमवर्गीय माणसे आपण घालू शकतो त्या पोशाखात आणि आपण करू शकतो अशा आचारात समोर वावरताना दिसतात. संगीतात कुठेही लाउडनेस नाही. त्यामुळे ही गाणी ऐकताना त्यांच्याबरोबर समरस झाल्याचा प्रत्यय मला येतो.
ह्या गाण्यांच्या चित्रपटांपैकी घर सोडून इतर सिनेमे माझे अनेकदा पाहून झालेत. ह्या गाण्यांसारखेच हे सिनेमेही मला खूप आवडतात. ज्यांना ही गाणी आवडली असतील पण सिनेमे पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा.
प्रत्येकाची आवड-निवड वेगळी, पार्श्वभूमी वेगळी, गाणी ऐकण्यामागचा हेतूही वेगवेगळा...त्यामुळे ह्या लिस्टमध्ये विशेष काय आहे असे वाटून काही लोकांना पोस्ट वाचून कंटाळाही आला असेल. त्यांना सॉरी. @बाकीचे पब्लिक: एन्जॉय!!