Monday, May 18, 2009

Jay ho!

Warning: अनेक वर्षांनी काहीतरी not-technical लिहायचा प्रयत्न करत असल्याने ह्या post मध्ये अनेक चुका आहेत. पण माझा patience संपायच्या आत ही post post (:D) कर अशी ताकीद डोक्याने दिल्याने जे आहे ते तसं present करत आहे. तेव्हा डोळे किंवा डोकं ह्यांना त्रास झाल्यास जबाबदारी घेतली जाणार नाही.
मी ठरवलं खरं की English मध्ये post लिहायच्या पण एक फार बोलकी घटना लिहाविशी वाटली. English मध्ये लिहायचा एक असफल प्रयत्न करूनही झाला. पण मला जे व्यक्त करायचं होतं ते तसं English मध्ये काही जमेना. त्यामुळे ही पोस्ट मराठीतून...असो ...
मी एकदा लोकलची वाट पाहात कांजुरमार्ग स्टेशनावर उभी होते. नेहमीप्रमाणे गोंधळ घालून, जायचंय त्याच्या उलट्या दिशेला तोंड करून उभी राहिल्याने एक लोकल सुटली होती. पुढची लोकल यायला भरपूर वेळ होता. आता काय करावं म्हणून इकडे-तिकडे पहायला लागले तर एक interesting वाटेल असं दृश्य दिसलं. एक आजीबाई , दोन-तीन मध्यमवयीन बायका विक्रीसाठी आणलेल्या वस्तू टोपलीत नीट लावत जमिनीवर बसलेल्या होत्या न् एक चाळीस-पन्नाशीतला माणूस जहागिरदारासारखा बाकड्यावर पसरलेला होता. त्याच्या बसण्याच्या style वरून त्याला काही उद्योग नसावा हे अगदी कळून येत होतं. त्यांच्या एकमेकांशी जोरजोरात काहीतरी गप्पा चालल्या होत्या. मला उत्सुकता वाटली. योगायोगाने Ladies डबाही अगदी ते बसले होते तिथेच येणार होता. मी कान देऊन त्यांचं बोलणं ऐकायला लागले.
आजीबाईंच्या टोपलीkiwi-fruits होती. गम्मत म्हणजे त्या त्यांना "कीव" असं म्हणत होत्या :D किम्मत मात्र प्रत्येकी २० रुपये होती. कान्जुर स्टेशनासारख्या ठिकाणी लोकांना किवी-फ्रूट माहीत असणे म्हणजे पौडावरच्या गणप्याला Angelina Jolie माहित असण्यासारखंच झालं :D काहीतरी नवीन फळ दिसतंय असा विचार करून येणारी-जाणारी लोकं मोठ्या उत्सुकतेने टोपलीतली Kiwi-fruits न्याहाळत होती, नाव आणि किम्मत विचारत होती. पण किम्मत सांगितली की त्यांचा चेहरा एकदम पडायचा आणि ती तिथून लगबगीने काढता पाय घ्यायची :D हा असा सगळा प्रकार बऱ्याच वेळापासून चालू असावा कारण आजीबाईंचा धीर हळुहळू सुटायला लागला. त्यांचा चेहरा अजूनच पडायला लागला. शेवटी तो मगाचपासून बाकड्यावर पसरलेला तो माणूस उठला न् आजीबाईंशेजारी जाऊन बसला. त्यांची टोपली त्याने स्वतःसमोर ओढून घेतली. एक माणूस चौकशी करू लागल्यावर तो त्याला म्हणतो कसा, "साहेब, इम्पोर्टेड आयुर्वेदिक माल आहे. बहुगुणी हा एकदम! सर्दी, ताप, खोकला कशावरही एकदम गुणकारी. शिवाय रक्तशुद्धीसाठी फक्कड़. मूळ किम्मत फ़क्त २५ रुपये आहे, बोहनीचा टाईम आहे म्हणून २० ला देतो. एकदा घेऊन पहाल तर परत डॉक्टरकडे पाय ठेवणार नाही तुम्ही!" माणूस एकदम कौतुकाने फ़ळाकड़े पाहू लागला आणि त्याचा हात लगोलग खिशाकडे जाऊन त्यातून पटकन दहाच्या दोन नोटा बाहेरही निघाल्या :D
आता मात्र त्या माणसाबद्दलचा आदर बायकांच्या डोळ्यांमधून ओसंडून वाहू लागला.
आता चिक्कुवाली बाई बोलायला लागली, "माझे चिक्कू काय पिकायचं नाव घेत नाहीत काही केल्या. एक दिवस वाट पाहिली, मग कार्बन भरून पाहिला... आता मात्र फेकून द्यायची वेळ आलीये." मी अवाक! आपण जे तयार चिक्कू म्हणून बाजारातून विकत घेतो ते कार्बन घालून पिकवलेले असतात? :-o
आता तो माणूस अगदी विद्वानाच्या अवेषात म्हणाला, "बाई एक काम करा. पुढच्या वेळपासून बोरीवलीहून चिक्कू घ्या, तान्दळात घालून ठेवा...एक दिवस थांबा न् मग बोला. चिक्कू चांगले नाही निघाले तर नाव बदलेन." हा सल्ला ऐकून मला जरा धीर आला :D नाहीतर अजून काय काय घालून फळ पिकवलं जातं हे ऐकून मला चक्करच आली असती.
आता मात्र हा माणूस भलताच हुशार दिसतोय अशी बायकांची खात्री पटली :D
तिसरी बाई बोलू लागली. तिला चार मुली होत्या न् एक मुलगा. बाई म्हणाली की ती धाकट्या मुलीसाठी पोस्टात पैसे टाकते दर महिन्याला. पण ह्यावेळी भरायला पैसे नव्हते. शिवाय चौथी मुलगी. फी माफी नव्हती. शाळेची फी भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न होता. हे ऐकून तो माणूस अतिशय शांतपणे म्हणाला "बाई कशाला इतकी दगदग करून घेता मुलीपायी. सरळ Remand Home मध्ये द्या पाठवून. जेवणा-खाणापासून सर्व सोय होईल . शिक्षण तिथेच होईल काय व्हायचं ते! " हे ऐकून मात्र मी थक्क झाले ...एखादा माणूस मुलीचा "खर्च" नको म्हणून तिला Remand Home मध्ये पाठवायचा सल्ला तिच्या आईला अगदी सहजतेने देऊ शकतो? एकदम cold bloodedly! त्या मुलीच्या आयुष्याचं काय? तिच्या बालपणाचं काय? तिच्या सुरक्षिततेची खात्री काय? आशा अनेक विचारांनी माझं मन पोखरायला सुरवात केली. मी सुन्न झाले एकदम. पुढचं काहीच ऐकू आलं नाही मला....
लेडीज डबा लगबगीने समोर येत "लवकर चढ़" असं ओरडला तेव्हा अचानक भानावर येऊन मी ट्रेन मध्ये चढले आणि Engine ने शिट्टी वाजवून आजचा "Slumdog Milleniore" चा show संपला असं जाहीर केलं!

3 comments:

  1. छान !
    खूप दिवसानी समकालीन, तात्कालिक मराठी लेखनातील चांगला अंश वाचण्यास मिळाला (स. ता. म. ले. मिळत नाही, असे नाही; आमचे वाचनच रोडावले आहे :D )
    पुणेरी 'टच' जपत वास्तवाशी संबंध साधण्यात आला आहे. (किंवा वा. सं. साधत पु. ट. जपण्यात आला आहे)
    ...
    पण प्रश्न असा आहे की, गाडी येते, 'शो' संपतो, आपण पुढे निघून जातो आणि फलाटावरचे ते तिथेच राहतात. असे का ?
    ते गाडीत कधी चढणार ? त्यांची अन् आपली गाडी समान असेल का ? असावी का ?
    (...आपण तरी ज्या गाडीत चढतोय ती गाडी नक्की आपली आहे का ?)

    ReplyDelete
  2. प्रश्न अगदी बरोबर आहेत न् ते मलाही पडले, पडतात! फ़क्त त्यांवर काही उपाय लोकांना सांगण्याइतकी maturity माझ्यात नाही म्हणूनच शेवट तसाच सोडून दिला आहे. वास्तव मांडलं, त्यावर विचार करण्याची जबाबदारी लोकांवरच सोडली आहे.

    ReplyDelete
  3. प्रश्न पडणे ही उत्तर मिळण्याची पहिली पायरी आहे.
    योग्य वेळ आल्यावर योग्य उत्तरे मिळतीलच.
    तोपर्यंत प्रश्नांचा कंटाळा करू नये, काय?

    ReplyDelete