एक सुन्दर सकाळ...
लवकर उठले, भराभर आवरलं, आज गाण्याचा क्लास होता ..
hostel मधून बाहेर पाऊल ठेवलं न मन प्रसन्न झालं...
ओल्या मातीचा वास..हिरवगार गवत, झाडं...हवेतला ओलावा...खूप छान वाटायला लागलं...
एकेक पाऊल चालू लागले...कुठेतरी काहीतरी कमी आहे असं मन खुणावायला लागलं...
गेली दोन वर्षं ह्या रस्त्यांवरून चालताना कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं...आता सगळे चाललेत एकेक सोडून...लांब...रोज रोज ना दिसण्यासाठी...तशीच चालत राहिले...
एका कोपर्यावर एक धष्टपुष्ट बोका दिसला, सोनेरी रंगाचा. जोर जोरात ओरडत होता. भुकेला होता. रस्त्यात मांजर दिसलं की माझ्या नकळत माझ्या तोंडून त्याला हाक जातेच. त्याने थोडासा भाव खाल्ला न जवळ आला. माझ्या पिशवीचा वास घेतला आणि हिच्याकडे काहीही खायला नाहिये हे पाहून थोडा हिरमुसला झाला. मला थोडंसं वाईट वाटलं पण क्लासला उशीर होत होता त्यामुळे त्याला न त्याच्याशी खेळण्याच्या विचारांना मागे टाकून पुढे निघाले. एकटेपणालाही तिथेच सोडता आलं असतं तर कितीबरं झालं असतं.
५-१० मिनिटांत सरांच्या घरी पोहोचले. तंबोरा हातात घेतला न तारा छेडल्या. सुरांमध्ये काय जादू आहे. एका क्षणात जगच बदलून गेलं. माझे गाण्याचे सर, मी आणि "हिंडोल".. सरांनी अलवारपणे हिंडोल माझ्या मनात, गळ्यात उतरवला. एक तास म्हणता-म्हणता निघून गेला. तम्बोर्याच्या तारांवरचा हात काढला न मन परत त्या सुरेल स्वप्नातून बाहेर पडलं.आता परत तोच एकटा प्रवास..
चालता-चालता IIT च्या गेटपाशी पोहोचले, बस पकडली. बस सुरु झाली. खिडकीतून बाहेर पाहू लागले. मला फार आवडतं चालत्या बसच्या खिडकीतून बाहेर बघत बसायला पण आज सगळच नको वाटत होतं. प्रत्येक जागेशी जुळलेल्या आठवणी. तेव्हा सगळे मिळून केलेली मजा. रुसवे-फुगवे...चिड़वा- चिडवी. काही गोष्टी जगातल्या कोणत्याच दुकानात मिळत नाहीत. काळ त्यांना घेऊन येतो न तुम्हाला न विचारता घेऊन जातो, कायमसाठी...डोळे खिडकीबाहेर पाहत होते न मन कुठेतरी भलतीकडेच...
अचानक लहान मुलांच्या चिवचिवाटाने एकदम दचकले. पाहिलं तर बस शाळेच्या समोरच्या स्टॉपवर थांबली होती. न लहान मुलांचा गोंधळ चालला होता बस मध्ये शिरण्यासाठी... बसमध्ये चढण्यासाठी पास नाहीतर कूपन दाखवावं लागतं. ड्रायव्हरकाकांच्या नकळत आपल्याला बसमध्ये कसं शिरता येईल ह्यासाठी काही मुलांची ख़टपट चालली होती तर काही मुलांची खिड़कीजवळची जागा पकडायला. एक लहान मुलगी खालतूनच जोरात म्हणू लागली "सपना मेरे लिए जगा पकडके रख".. आतून ती सपना ओरडत होती "अरे जगा नाही है तो किधर से पकडू?" एक मुलगा दुसर्या मुलाला टपली मारत म्हणाला "ए आज माझा चांस आहे खिडकीत बसायचा, ऊठ! " दुसरा मुलगा म्हणाला "कुछ भी क्या! आज मेरी बारी है." पहिला म्हणाला "ज्यादा शाणपट्टी की ना तो मैडम को बोल देगा कल की आज तू बेंच के नीचे बैठ के डब्बा खा रहा था क्लास के टाइम!" असा गोंधळ ५ मिनिट अखंड चालू होता न अचानक सगळे आवाज थांबले...बस सुरु झाली. सगळी मुलं एकमेकांच्या कड़े पाहात होती. काही खिडकीची जागा मिळाल्याबद्दल एकदम संतुष्ट दिसत होती. काही ती नाही मिळाली म्हणून खिन्न झाली होती...ही शांतता टिकली २ मिनिट...परत गोंधळ सुरु...
बसच्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलांनी बसच्या ओलसर खिडकीला नाकं चिकटवली न रस्त्याने येणार्या- जाणार्या लोकांना ती वाकुल्या दाखवायला लागली. तेवढ्यात त्यांच्यातला एक म्हणाला "ए बैठो नीचे ...ड्रायव्हरने अभी ब्रेक लगायाना तो गए सब के सब उप्पर!" result=> तो एकटाच खाली बसला न इतर मुलांनी आपला पराक्रम चालू ठेवला.
इकडे मुलींच्या वेगळ्याच गप्पा चाललेल्या होत्या. तुमच्या क्लासटीचर कोण? आज पिंकीच्या नव्या रिबिनी कश्या भारी दिसत होत्या... उद्या डान्सचा क्लास कधी आहे...
मला एकदम माझे शाळेतले दिवस आठवले. अगदी असच चालू असायचं आमचंही..परत एकदा लहान व्हावं असं वाटायला लागलं. ती १०-१५ मिनिटं जीवनाने रसरसलेली वाटली. Techonlogy च्या कोरडेपणाने गंजलेल्या भावनांना परत ओलावा मिळाला न आईचे शब्द आठवले "तुम्ही कितीही शिका, मोठे व्हा..आयुष्यात माणसं लागतातच." घरी होते, सतत कोणाची तरी सोबत होती तेव्हा ह्या वाक्यांचा खरा अर्थ न किम्मत कळली नाही. स्वतःचा अभ्यास, स्वतःचं जग, माज, न त्यात इतर सामान्य माणसांना नसलेली जागा...बास...
IIT ने Technogy शिवाय अनेक गोष्टी शिकवल्या त्यातली ही एक की "Technology/Career हे आयुष्य नाही. माणसं आहात, माणसासारखे वागा. आनंद द्या न घ्या. तेच खरं जीवन!"

Nice post. Do keep writing.
ReplyDeletegood post! IIT (mumbai ka?) khup chhan anubhav dete aayushyabharasathi cha.. he diwas njoy karun ghe!
ReplyDeleteek dam mast lihala ahes!!
ReplyDeletelahan mulanchya gappa bharich ahet ekdam :D
छान, लिखाण आवडले.
ReplyDeleteमला फार आवडले हे पोस्ट - एकदम साधेसोप्पे मस्त.
ReplyDeleteApratim..... Faarach sundar varnan baher padalay....
ReplyDeleteThings are improving exponentially in ur writing since ur first post. Keep it up.
"Technology chya kordepanane ganjalelya bhavananna parat Olawa milala n aaiche shabd athawale...'Tumhi kitihi Shika, Mothe wha...Aayushyat Mansa lagtatach' "
This sentence proved to be the heart of the post for me....
Gr8 going :)
Chhan lihila ahes!!
ReplyDeleteEkdum manobhavi varnan.
ReplyDeletefakt ek suggestion ahe... tu baryach thikani 'an' chya eiwaji 'n' lihites. tyamule vachtana patkan parse karata yet nahi.
गेली दोन वर्षं ह्या रस्त्यांवरून चालताना कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं...आता सगळे चाललेत एकेक सोडून...लांब...रोज रोज ना दिसण्यासाठी..........................................जगात आपण एकटेच असतो! इथे आल्यानंतर आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी नातेसंबंध बांधतो, आई, बाप, भाऊ बहीण, बायको, पोरं, मित्र वगैरे.....
ReplyDeleteकाही रक्ताच्या नात्याचे, काही मानलेले.......
पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो!! इष्ट्मित्रांसाठी आपल्या तेराव्याच्या मिष्टान्नाची सोय करून
Sundar!!!