Tuesday, September 1, 2009

Namesake

जर आमच्या मांजरांच्या नावांची यादी कोणाला सांगितली तर "ही बापट मंडळी सिनेमाची न टी. व्ही. ची कमालीची शौकीन दिसतायत" असा विचार समोरचा माणूस करेल ह्याची मला हजार टक्के खात्री आहे! पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे...पण अशा मजेदार मुहुर्तान्वर त्या-त्या मांजरांनी आमच्या घरी एंट्री मारली की परिस्थितीने त्यांची ती-ती नावे ठेवायला आम्हाला भाग पाडले :D
आमच्याकडे आलेल्या एका पिल्लाचे नाव होते "नन्हे"...वयाने लहान असल्याने ह्या नामकरणाच्या वेळी माझे मत लक्षात घ्यायची तसदी कोणी घेतली नाही...खरे तर हे नाव मला अजिबात आवडले नव्हते....त्यामुळे हे नाव असे का ठेवले हे जाणून घ्यायची माझी इच्छा झाली नाही...
नन्हे नंतर अनेक वर्षे मांजरांची नावे त्यांना शोभतील अशी म्हणजे Sony, Blacky, Chocky आदि ठेवण्यात आली. पुढे Blacky च्या पोटी एका बोक्याने जन्म घेतला :D हा बोका करड्या रंगाचा होता...कधीही जवळ यायचा नाही न खंडणी वसूल करायला आल्याप्रमाणे फ़क्त दूध प्यायला घरी यायचा न जाता जाता घरातील इतर मांजरान्वर गुरगुरत जायचा, म्हणून त्याला लखन असे नाव दिले गेले :D
नंतर काही काळ Blacky, Chocky (Junior) ह्या नावांना मान दिला गेला :D न मग एंट्री मारली ढोलू आणि जादूने :D
ढोलू हा अतिशय furry, पांढराशुभ्र न धष्टपुष्ट असा लाडावलेला बोका होता...न त्याची बहीण जादू ही अतिशय रोड अशी भाटी होती. ड़-जीवन सत्त्वाअभावी मुडदूस झालेल्या बालकाचे चित्र एकदा विद्न्यानाच्या पुस्तकात होते, त्याची आठवण व्हायची तिला पाहिल्यावर...नवजात मूल जर रोगट असेल तर त्याचे नाव ठेवत नाहीत अशी पूर्वी प्रथा होती. ही जादू जगेल असेल वाटत नसल्याने सुरवातीला आम्ही तिचे नावच ठेवले नाही. पण तिने काही महिन्यात ज़रा बाळसे धरले. ह्याच वेळी आम्ही "कोई मिल गया पाहिला". त्यातील जादू ह्या Alien सारखी जादू तेव्हा दिसत असल्याचे सर्वांचे मत झाल्याने न ती आश्चर्यकारकरित्या जगाल्याने तिचे नाव जादू ठेवले :D
ह्याच सुमारास एक बोका आमच्याकडे आला. तो एकदम लाडिकपणे वागायचा ...बाबा पुजेला बसले की त्यांच्या खांद्यावर जाऊन बसायचा. मी अभ्यासाला बसले की मांडीत झोपायचा. तो एकदम लाडका होता आमचा..तो करडा होता.तेव्हाच दूरदर्शनवर "नंदू अपना" नावाचे animation लागायचे. त्यातला नंदू (हत्तीचे पिल्लू) न हा बोका ह्यांच्या character न रंगामध्ये कमालीचे साम्य होते...न त्याचे title song होते "सब का दुलारा नंदू अपना, सब का है प्यारा नंदू अपना " त्यामुळे बोक्याचे नाव नंदू ठेवले :D
जादुला दोन पिल्ले झाली (एक बोका न एक भाटी) तेव्हा "बंटी और बबली" हा सिनेमा गाजत होता ... बंटी न बबलीची जोड़ी आमच्या घरी पण धुमाकूळ घालू लागली... :D
पुढे बबलीला पिल्ले झाली (परत एक बोका न एक भाटी) तेव्हाच आम्ही "लगे रहो मुनाभाई" पाहिला...बोका खूप दंगा-मस्ती करायचा न भाटी दिसायला एकदम गोड न शांत अशी होती...सिनेमातल्या जान्हवी न मुन्नाशी बरोबरच्या त्यांच्या resemblance मुळे त्यांची नावे जानू न मुन्नू ठेवली...
पुढे जानूला एक जाड जूद, दाणगट, खोडकर असे पिल्लू झाले...त्याच्या देहाला मान देऊन त्याचे नाव मोटू ठेवले...
अजून एक अगदी डोळे न उघडलेले, चलाताही न येणारे, पांढर्या रंगाचे पिल्लू कोणीतरी आमच्या इथे सोडून गेले...ते आम्ही साम्भाळले ... ती भाटी होती... त्याच सुमारास आम्ही Black हा सिनेमा पाहिला... त्यातली छोटी Mischel असते तशीच ही मांजरी होती.. म्हणून तिचे नाव Mischel ठेवले..
ह्यानंतर मात्र आमच्याकडे नवीन मांजरांना प्रवेश न देण्याचे धोरण केले गेले....त्यामुळे t v तली पात्रे आमच्या घरी यायची बंद झाली :D

4 comments:

  1. कदाचित पुर्वी टीव्हीवर रामायण-महाभारत लागायचे तेंव्हा तुमच्याकडे कुणी मांजरे आणून सोडली असती किंवा जन्माला आली असती तर तुमच्या घरी समस्त कौरव पांडव आणि वनरसेना मांजरांच्या रूपात पाहायला मिळाली असती... :D

    ReplyDelete
  2. छान लिहिलं आहेस. तुला मांजरांचे (आणि एकूणच भूतमात्रांचं !) फारच प्रेम दिसतंय :)आणि नुसतंच प्रेम नसून ’प्रत्यक्ष कृती’ पण करतियेस वाटते ! बाकीची पोस्ट्स पण वाचली. सुरेख आहेत. लिहीत रहा.
    रामदास स्वामींकडे पण एक ’राम’ नावाचा बोका होता, आणि त्याला खाऊ घातल्यावरच ते स्वत: जेवायचे !

    - निखिल

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. tumche ghar mhanje praani-sangrahalayach ahe watate! :D

    ReplyDelete