Tuesday, July 28, 2009

ही पोस्ट वाचू नका! :D

माझा मोबाइल बराच काळ विचित्रपणे वागत होता. वरची दोन बटने चालत नसल्याने Key Pad Unlock च होत नव्हते. त्यामुळे Messages लिहिणे अथवा वाचणे, Missed calls किती आहेत ते दिसले तरी ते कोणाचे आहेत हे बघणे, कोणाला Call करणे ह्यातली कोणतीच कृती करणे अशक्य होते. सुदैवाने हिरवे बटन चालत असल्याने फ़ोन तेवढा घेता येत होता. ज्या माणसाला फोनकडून एवढीच अपेक्षा असेल त्याला कसले बरे पडेल असे झाले तर...लोकांना सांगायला आयते कारण...फुकटात सगळी कामे होणार...पण दुर्दैवाने माझे तसे नव्हते. फोन ही गोष्ट किती गरजेची होऊन बसलीये हे तेव्हा जाणवले. असो, सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. तर माझ्या मोबाइलच्या अशा वागण्याची मला सवय झाली होती. न ज्या दिवशी माझा मोबाइल दुरुस्त झाला त्या दिवशी असे झाले की मला जर Message आला किंवा जर Missed Call दिसला तर आता ह्यावर काहीतरी respond करायची गरज आहे अशी जाणीवच मला होत नव्हती. म्हणजे माझ्या मोबाइलच्या अशा विचित्र वागण्याची मला सवय झाली होती. मी न भक्ती मेसमध्ये गप्पा मारत होतो तेव्हा मी हे सगळे तिला सांगितले. ती म्हणाली की "कोणत्याही गोष्टीची आपल्याला लगेच सवय होते नाही का?"
हम्म...माणूस परिस्थितीला Adapt होतो त्याचेच हे अगदी साधे उदाहरण नाही का...

4 comments:

  1. मी वाचले, मी वाचले,.. कारन माझ्या किबोर्ड वरची आणि माऊसची सगळी बटणं चालु आहेत.. :-)

    ReplyDelete
  2. lihaycha asta manun loka kahi hi lihitat shaaa

    ReplyDelete
  3. हे म्हणजे "रंग ओला आहे, विश्वास नसेल तर हात लाऊन बघा" असं झालं!

    ReplyDelete