Wednesday, July 15, 2009

कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया

मेरी Laundry का एक Bill, एक आधी पढ़ी Novel
एक लड़की का Phone Number, मेरे काम का एक Paper
मेरे ताश से Heart का King, मेरा एक चांदी का Ring
पिछले सात दिनों में मैंने खोया
कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया

ह्या "Rock On!" च्या गाण्यात त्यातल्या Hero ला काय वाटले म्हणून त्याने हे गाने लिहिले माहित नाही पण त्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागल्याने असले गाणे सुचले असेल त्याची प्रचिती मात्र मला गेल्या काही दिवसांत आली :डी
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मी माझ्या नव्या रूम मध्ये शिफ्ट झाले. Bag मध्ये सामान भरायचे, Bag नवीन रूम मध्ये नेऊन ठेवायची, रिकामी करायची, ती घेऊन जुन्या रूम मध्ये जायचे, परत सामान भरून आणायचे, ओतायचे, परत भरायचे...असा प्रकार मी दिवसभर केला (माझ्याकडे एकच Bag असल्याने हा प्रकार करावा लागला). दोन वर्षांमध्ये आपण किती सामान आपण जमवून ठेवले आहे (न का?) ह्याची मला जाणीव झाली. शेवटी इतकी दमछाक झाली की जेवायला एक जीना उतरून मेस मध्ये जायचे त्राण अंगात उरले नाही. तशीच खुर्चीत पडले :D
दिवसभर Computer चे तोंड न पाहिल्याने चैन न पडायला सुरुवात झाली (ह्यावरून मी हाडाची Computer Engineer आहे हे Prove होते :D)..PC चे सगळे Wiring करून (Sysad असल्याचा एकच फायदा हा की इतर मुलीन्सारखे ह्या कामासाठी मला कोणावर अवलंबून रहायला लागत नाही :D) पीसी चे बटन ऑन केले. माझा पीसी ऑन होताना थोडा Problem देतो हे माहित असल्याने तो बटन दाबताच सुरु झाला नाही हे मी विशेष मनावर घेतले नाही. त्याला तसाच ठेऊन इतर सामान लावायला सुरुवात केली. दोन तासाने पाहिले तरी महाशय अजून बंदच. त्याच्याशी थोडी मारामारी केली की त्याला सुरु व्हायची अक्कल येते नेहमी त्यामुळे बरीच खुड्बुड केली..चालू झाला नाहीच..होइल चालू असे म्हणून परत सामानाची लावालाव सुरु केली.
३ तास झाले, ४ तास झाले...चालू व्हायचा पत्ता नव्हताच...

म्हणले ठीके रात्रभारात तरी चालू होईल, तोवर Mobile ने घरी बोलून घेऊ..पाहाते तर Mobile ची पहिली २ बटने काम करत नव्हती :( बहुधा Moisture चा परिणाम होता..ह्याचा परिणाम म्हणजे माझे Key Pad च Unlock होत नव्हते :( मग तो बंद केला, Battery काढली, परत घातली न चालू केला न परत lock होण्याआधी पटकन घरी फ़ोन लावून बोलून घेतले.
सकाळी उठाल्याबरोब्बर PC डोळ्यासमोर दिसला, तो आतातरी चालू झाला असेल ह्या आशेने मी बेड वरून त्याच्या दिशेने झेपच घेतली. पाहते तर अजूनही तो बंदच :( आता मात्र काहीतरी major problem आहे अशी माझी खात्री झाली. काय झाले असावे बरे? Motherboard ला problem असेल का? की SMPS गेला असेल? की शिफ्टिंगच्या गडबडीत wires सैल झाल्या असतील? बर्याच possibilities होत्या. रविवार होता. Vendors घरी सुट्टीचा आनंद घेत बसले असणार. अन शिवाय मीही Sysad आहे. Vendor ला उगाच २०० रुपये द्यायचे माझ्या पुणेरी स्वभावात मुळीच बसणारे नव्हते. आपणच PC दुरुस्त करायचा असा निश्चय केला. Sysad रूम मध्ये जाऊन, शोधाशोध करून एक SMPS मिळवला, तो PC ला बसवला, PC सुरु झाला नाही तो SMPS च खराब असणार असा निष्कर्ष काढला. परत Sysad रूम मधून दुसरा SMPS आणला ह्यावेळेस मात्र तो खराब नसल्याची आधीच खात्री केली :D तो आणून बसवला. पीसी चालू झाला :) :) एवढे करून निष्कार्ष हा निघाला की SMPS गेलाय :D दूसरा SMPS विकत आणला, बसवला, एकदाचा पीसी सुरु झाला. मी Sysad असल्याचा मला अभिमान वाटला :D
आता पीसी समोर बसले. न बोटे Key Board वरून चालवायला सुरुवात केली. पाहाते तर तोसुद्धा नीट काम करत नव्हता :( न माउस पण कसातरीच वागत होता :( मुम्बईच्या Moist हवेला शिव्या घालत घालत माउस उघडून स्वच्छ केला. नंतर Key Board उघडला. उलट्या दिशेने उघडल्याने त्याच्या Buttons वर असलेल्या सगळ्या टोप्या खाली पडून खोलीभर विखुरल्या. एकेक टोपी गोळा करून मोठ्या शिताफीने KEy Board वर परत बसवायाचा प्रयत्न केला. पण पत्त्यांचा बंगला तयार करायला जेवढी एकाग्रता लागते तेवढीच ह्याही कामासाठी गरजेची आहे हे लवकरच लक्षात आले. सगळ्या टोप्या काही केल्या जगाच्या जागी बसेनात. हे काही अपल्याने होणार नाही अशी खात्री पटल्यावर कोणाकडे एखादा जुना पुराणा spare Key Board आहे का ह्याच्या चौकश्या सुरु केल्या. सरते शेवटी एक key board मिळाला न माझा पीसी खर्या अर्थाने सुरु झाला.

दुसर्या दिवशी घरी जायचे होते. घरी वेळ छान गेला. परत येताना अजून एक Story घडली. प्रगतीने पुण्यापासून दादरला आले. आता लोकलचे टिकेट घ्यायचे न कांजूरला उतरायचे म्हणून जीना चढायला सुरवात केली. माझ्यासोबत IIT ची जी मुलगी होती ती म्हणाली अग आपल्याकडे दादरपर्यंतचे टिकेट आहे ना मग आता कांजूरला जायला टिकेटची गरज नाही. मी म्हणले "पण दिशा उलटी झालिये तर टिकेट लागणारच!" तर ती मला म्हणाली "नाही अगं, मी नेहमी तशीच येते. एकदा तर TC ने हेच टिकेट पाहून मला सोडलेही होते." तिने TC च्याच तोंडचे बोल सांगितल्याने माझी खात्री झाली न आम्ही तश्याच लोकल मध्ये बसलो. लोकल कांजूरला पोहोचली न आम्ही सुखरूप (?) उतरलो. कांजूर स्टेशनवर एकाही माणसाने कधी TC ला पाहिले असेल आहे का? paN त्यादिवशी TC aamachich वाट पाहात तिथे उभा होता. त्याने टिकेट मागितले, आम्ही प्रगतीचे टिकेट दाखविले,त्याने आम्हाला Control Room मध्ये येण्याचे आगत्यापूर्वक निमंत्रण दिले :D तो पुढे न आम्ही त्याच्या मागे अशी वरात निघाली. ह्या मुली मागच्या मागे पळणार तर नाहीत ह्या संशयाने तो पुन्हा पुन्हा पोलीस चोराकडे पाहात असावेत त्या नजरेने तो आमच्याकडे वलून वलून पहु लागला. लोकांची फुकटात Entertainment करण्याचे भाग्य मला लाभले. Control Room मध्ये नेऊन त्याने आमच्याकडे प्रत्येकी २५७ रुपये मागितले. आम्ही खूप समजावायाचा प्रयत्न केला की आम्ही मुद्दाम हे केलेले नाही, त्या आधीच्या TC ने सोदाल्याने आमचा गैरसमज झालाय पण तो काही केल्या तो ऐकेना. मी म्हणाले "माझ्याकडे एवढे पैसे नाहीत.(त्यादिवशी खर्च कड़की होती.)" तो म्हणाला पालकांना घेऊन यायला सांग. मी म्हणाले मी IIT त आहे. तो म्हणे मित्र-मैत्रिनिन्ना बोलावून घे. मी म्हणाले सगळे सुट्टीसाठी घरी गेलेत. तो म्हणे काहिःइ करा पैसे द्यायला लागतील. मी म्हणले "नाहिचेत तर कुठून आणू? तुम्हीच काय हवे ते करा..पैसे नाहीत माझ्याकडे!" शेवटी तो म्हणाला "ठीके मी एकीचाच दंड घेतो!" २५७ ऐवजी १२५ रुपयात सुटका झाल्याबद्दल देवाचे न त्या माणसाचे (मनातच)आभार मानत तिकडून पळ काढला. रूमवर आले न किल्लिसाठी Bag च्या खणात हात घातला तर काय किल्ली तिथे नव्हती. आता लक्षात आले की काही सामान घरी काढून ठेवले त्यासोबत किल्लीपण तिथेच राहिली :( हा प्रकार मी आधीही केला होता. त्यामुळे धडा शिकून रूमाला अशी वेळ परत आल्यास तोड़ता येईल असेच कुलूप लावले होते. खालून हातोडा आणला न कुलुप तोडले. IIT तूं बाहेर पडल्यावर काही काम नाही मिळाले तर आपल्याला इतर अनेक कामे करता येऊ शकतात ह्याची खात्री झाली :D

ह्यानंतर अनेक तर्हेच्या प्रोब्लेम्सनी मला त्रास दिला. पुण्याला नीट चालणारा Mobile इथे येताक्षणी चालेनासा झाला. सर्व बटने एकापाठोपाठ एक बंद पडत गेली. कोठेही दुरुस्त करून मिळाला नाही. आता फक्त हिरवे बटन चालू आहे. त्यामुळे निदान आलेला कॉल तरी घेता येतोय.
पोट बिघडले. Hostel चे अन्न खाऊन माणूस आणखी आजारी पडतो असा अनुभव आधीच आलेला होता. ORS तयार करून (पानी+ मीठ +साखर) न थोडासा भात ह्यांवर २ दिवस काढले. मेसमधे मिळालेला मऊ भात नेहमीच्या भाताहून जास्तच घट्ट असतो हेही समजले. हे कमी म्हणून की काय कानात एक फोड़ आला. तो मोठा मोठा होउन त्याने भयंकर रूप धारण केले. सतत कान थानाकू लागला. हे मैत्रिणीला सांगितले तर ती म्हणाली "मलाही असे झाले होते तर IIT च्या दवाखान्यातल्या डॉक्टरनी एक औषध दिले. ते घेतले की मला एकदम चक्कर यायला लागायची. न मी कुठे आहे मला समजायाचेच नाही.....xyz" पुढचे मला काही ऐकूच आले नाही. भीतीने गाळण उडाली. काही झाले तरी डॉक्टर कड़े जायचे नाही असे ठरवले. पण जर दुखणे वाढले तर काय? ह्या भीतीने मला ग्रासले. नशिबाने रात्री हा फोड़ आपोआप फुटला न कान दुखाय्चा थांबला :D आता पोटही नीट होते.

दुसर्या दिवशी दुपारी मेस मध्ये शालिनी भेटली. ती म्हणाली "अगं, दासान्पसून सावध रहा बरं का...मला आज Shivering होत होते म्हणून मी डॉक्टरकड़े गेले तर त्यानी मलेरिया असण्याची शक्यता व्यक्त केली न टेस्ट करायला सांगितल्या आहेत. आपल्या हॉस्टल मध्ये मलेरियाच्या अजून २ केसेस निघाल्या आहेत असे म्हणाले ते..." झाले माझा गेल्या काही दिवसांचा प्रकार लक्षात घेता आपल्याला तर काही झालेले नाही ना अशी भीत मला वाटायला लागली. मी रूमवर आले तर मला खूप थंडी वाजतीये असे मला वाटायला लागले (बाहेर पावासामुले खरच थंडी होती :D). मी लगेच पांघरू N घेऊन बेडवर आडवी झाले. अर्धवट झोप लागली. आपल्याला मलेरिया झाल्याची स्वप्ने पडू लागली. तासाभराने जेव्हा पूर्ण जागी होऊन नीट विचार केला तेव्हा आपल्याला काही झालेले नाही ह्याची समजूत मनाला घातली :D न थंडी वाजेनाशी झाली :D

ह्याक्षणी तरी सगळे काही ठीक चाललेले आहे. न काही दिवसांत घडलेल्या घटना आठवल्या की हसावे का रडावे ते काळात नाहीये :D

4 comments:

  1. Nice(??) account..
    Maybe tu yala "Your series of Unfortunate Events" mhanu shaktes..
    And well thanks for that tip. Malahi vatayche ki Dadar varun ulta yetanna ticket kadhava lagat nahi.. Nasheeb kadhi TC ni pakadla nahi.. Bahuda mulinnach pakdat asave..
    :)

    ReplyDelete
  2. Thanyala utarla (Indrayani/Intercity ne) tar Kanjur la yayla wegla ticket lagat nahi, karan direction same ahe. Dadar hun ulta yayla ticket nakkich lagel! :) Tasa jar asta tar kuthlyahi prawasala return journey cha ticket kadhaychi garajach kay hoti? :D

    Khoop chhan lihila ahes. Mazya ani Winee chya babtit pan asach kahi ghadat ahe recently (amha doghanchya hatun gelya athawdyat 5 kachechya wastu futlya, ani mazi bike chi killi harawli :))

    Do keep writing!

    ReplyDelete
  3. संदीप बरोब्बर बोलला :) स्टेशन वर उतरल्यावर सांगितल पाहिजे होते की मे ठाणे किंवा कल्याण वरुन आलीय म्हणून :) पुढच्यावेळी लक्षात ठेवा :) मी सुध्दा कांजूरचाच आहे. कॉलेज मध्ये पैसे नसले की कधी कधी विदाउट तिकीट यायचो. कांजूरला तसा कधी टीसी नसायचा, दिसला तर स्टेशन च्या मध्ये जाऊन 1 नंबर च्या रळात उतरून प्लॅटफॉर्म च्या बाहेरून चालायचो :)
    आणि हो, तुमचा लेख आवडला :)

    ReplyDelete
  4. Hilarious !! Last para reminded me so much of situation in pune 1/2 weeks back !!

    -Nikhil

    ReplyDelete