Monday, December 21, 2009

बिबट्या आला रे आला...

खूप दिवस झाले काही लिहिलेले नाही...हात लिहायला शिवशिवतायत, न मन साठलेले रिते करायला...
मी इतके दिवस का नाही लिहिले काहीच...? लिहिण्यासारखे काहीच पाहिले, वाचले वा अनुभवले नाही...मम तसे तर शक्यच नाही...प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो... मग मला काही लिहावेसे वाटले नाही...अहं खूपदा इच्छा झाली...मला वेळ नव्हता...हमम ही excuse चांगली आहे...
माझ्या प्रोजेक्टची स्टेज, प्लेसमेंट्स होत्या ना...आपण काही काही गोष्टींचा किती बाऊ करतो नाही का...विनाकारण...प्रोजेक्टची स्टेज होणारच होती, न प्लेसमेंटसुद्धा ...असो!
तर म्हणून मी काही लिहिले नव्हते...पण मधल्या काळात काही काही मजेदार गोष्टी घडल्या share करायलाच पाहिजेत अश्या...
दरवर्षीनुसार बिबट्या आपली "IIT Safari" करून गेला...आपण कसे जातो अभयारण्यात प्राणी पहायला, change म्हणून, तसे बिबट्यालाही बहुतेक अभयारण्यातील तेच तेच प्राणी पाहून कंटाळा येतो न तो वेगळे प्राणी दिसावेत म्हणून IIT त येतो...केस, दाढ़ी-मिश्या वाढवलेले, हाफ चड्डी घातलेले, अंघोळ न केलेले, कधीही न धुतलेले कपडे घातलेले इकडचे विद्यार्थी त्याला जंगलामधील प्राण्यांइतकेच ओळखीचे वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही..सोबत साप, माकडे, सरडे, घोरपडी आदि प्राणीही दिसले की त्याला अजूनच comfortable वाटत असेल...
हा तर नेहमीप्रमाणे बिबट्या IIT त येऊन गेल्या...लेक- साइड, हिल-साइड वगैरे ठिकाणी कोणाला तो दिसला, न त्यावर त्यांची reaction काय झाली ह्याच्या चर्चा मेसच्या टेबलावर झडायला लागल्या...काही दिवसांनी नेहमीप्रमाने सिक्यूरिटीवाल्यांचे मेल आले "बिबट्या बद्दलची सूचना: गेले काही दिवस campus मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या बातम्या येत आहेत. बिबट्याला पकड़ण्याचे/रानात परत पाठवण्याचे प्रयत्न वन खात्याकडून केले जात आहेत. vulnerable ठिकाणी विशेष गस्ती पथके गस्त घालत आहेत. तरी लोकांनी खालील सूचनांचे पालन करावे." ह्या सूचना वाचताना काय काय इचार मनात आले ते मजेदार होते...
१) प्राण्याला दगड मारून त्याला छेडू करू नये (बिबट्याला दगड मारायची हिम्मत कोणी करत असेल असे वाटते का?)
२) प्राण्याचे फोटो घेऊ नयेत, त्याचा पाठलाग करू नये, तो चेकाळेल अशी कोणतीही genstures करू नयेत. (imagine, की बिबट्या समोर आहे, न तुम्ही असे उद्योग करत आहात! :D )
३) बछड़े दिसले तर ते चेकाळतील अशा प्रकारे वागू नये कारण त्यांच्यासोबत असणारा प्राणी धोकादायक ठरू शकतो. (असा काही करायची कोणाची हिम्मत होइल का?)
४) आजूबाजूचे कुत्रे भुन्कू लागणे, सैरावैरा धावू लागणे हा धोक्याचा इशारा समजावा. (इयत्ता चौथीतल्या मुलालाही आजकाल हे द्न्यान असते असे नाही वाटत का?)
५) बिबट्याला प्रकाश न फटाक्यांची भीती वाटते, तेव्हा रात्री बाहेर पडल्यास सोबत टोर्च असू द्यावा व तो flick करत ठेवावा! (हे असे किती दिवस करायचे? ज्या दिवशी टोर्च विसरू त्याच दिवशी बिबट्या आलातर? )
शिवाय अजून एक conversation फारच मजेशीर होते...
हे मेल ज्या सिक्यूरिटी सेक्शनकडून आले आहे त्यातच कामाला असणारे शिपाईकाका एकदम घामाघूम होऊन रात्रीच्या ड्यूटीवर आले न आधीच्या शिफ्टवर असणार्या शिपाई काकांना म्हणाले, "आज लय danger गोष्ट झाली रे येता येता...मी असा भराभरा निघलेलो...वाघ फिरतोय ना...हा तर निघलेलो...तर शेजारून एकदम छोटं जनावर जात असल्यागत वाटलं ...माझी असली टरकली...म्हनला बिबट्याचं पिल्लू असन...म्हंजे त्याच्या मागं त्याची आई बी असणार...धावायचं म्हनलं तर जमतय कुठलं आता...म्हनलं रामाचं नाव घेऊ न काय...निगलो तसाच ते गुमान हिकडं आल्यावर श्वास घ्येतला... "
आता असे हे आमचे सिक्यूरिटी गार्डस...बिबट्यालाही मजा वाटत असेल ना...अभयारण्यात तर त्याला कोणी घाबरत नाही...तेवढाच जरा change :D

note: मेलचे जे भाषांतर आहे ते अतिशय बण्डल दर्जाचे आहे तरी वेळेअभावी त्याला दुरुस्त करणे शक्य नाही तेव्हा भावना समजाव्यात, अगदीच चिडचिड खाली तर उघडपणे (comments चा वापर करून) अथवा मनातल्या मनात बिनधास्त शिव्या घालाव्यात...

3 comments:

  1. मस्त लिहीले आहे.
    ह्या सुचना इतक्या हास्यापद असतात की ह्या कोण लिहिते तेच कळत नाही.
    माझ्या office मध्ये पन असे काही फलक आहेत.
    १) बागेत फक्त हिरवळ आणि काही निवडुंग आहेत. आणि सुचना की फुले तोडू नयेत.

    ReplyDelete
  2. किस्सा भारी आहे बरं का, सुचना वाचताना मी खुप हसलो. अशाच सुचना मी एकदा कुठल्यातरी जंगलात वाचल्या होत्या सुचना होती की प्राण्याला काहीही खायला देऊ नये ! च्या आयला आम्ही त्याच खाणं बनु नये, त्याला कशाल कोण खायला घालतय नाही का ?

    बाकी पोस्ट मस्त जमलीये, लिहीत रहा

    -अजय

    ReplyDelete
  3. या बिबट्या ची पहिली खबर मी h1 मध्ये वाचली.
    h1 च्या प्रवेशद्वारातील कृष्णफलक ही एक विशेष गोष्ट आहे. तिथे बंडूच्या हरवलेल्या बंडी पासून बाहेर भटकणाऱ्या बिबट्यापर्यंत सर्व गोष्टींची ब्रेकिंग न्यूज असते. असो.
    प्रस्तुत खबर अशी होती [भाषांतर]: "सावधान ! बिबट्या दिसला. आज पहाटे मला स्विमिंग पूल जवळ बिबट्या दिसला." आणि खाली हा 'चक्षुर्वै सत्यम्' चा साक्षात्कार घडलेल्या महापुरुषाचे नाव पण होते. ते येथे उघड न केलेलेच बरे.
    तर आम्ही ती न्यूज वाचली. आणि रात्री सावधपणे फिरावे अशी स्वतःला व जवळच्या मित्रांना सूचना करून विषय सोडून दिला.
    पण हा बिबट्या पुन्हा न्यूज रूपाने दोनच दिवसात आम्हाला आडवा आला. आणि लहानपणी खेळलेल्या 'कानगोष्टी' या खेळाची आठवण झाली. या वेळी मी जेवणाच्या टेबलवर बिबट्या ऐकला. या वृत्तांतात "स्विमिंग पूल जवळ" ऐवजी बिबट्या "स्विमिंग पूल मध्ये" पोहोचला होता . गोष्ट येथे थांबती तर ती lunch-table वरची चर्वित-चर्चा कशी होती ? तस्मात, येथून कथा सर्व वक्त्या-श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीचे दोर धरून उडू लागली, आणि पहाटेची स्विमिंगची पहिली batch ही महिलांची असल्याने त्या बिचाऱ्या बिबट्याच्या चारित्र्यावर त्याच्या शरीरावर आहेत त्यापेक्षा अधिक शिंतोडे उडविण्यात आले...
    (ता. क. : प्रस्तुत बिबट्या हा बिबट्या नसून बिबट्याची आई आहे हा खुलासा नंतर झाला, आणि 'तसल्या' चर्चांना आळा बसला)

    ReplyDelete