दिवस होता भाद्रपद शुद्ध षष्ठीचा. 'काही विशेष का असते भाद्रपद शुद्ध षष्ठीला?' असा विचार करत असाल तर डोके वापरणे लगेच थांबवा. असेच आपले सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जड शब्द वापरले. असो, दिवस तसा साधाच होता. पण आमच्याकडे त्या दिवशी एक गम्मत घडली.
तेव्हा घरी अभिजित आणि मी असे दोघेच असायचो. त्या दिवशी संध्याकाळी कम्पनीतून घरी आले आणि पाय धुवायला म्हणून बाथरूममध्ये जायला निघाले. दार उघडता क्षणी कमोडच्या कडेवर एक काळा पट्टा दिसला. 'काय असेल ते?', अशा विचारानेच माझ्या हृदयाचा ठोका चुकला. अभिजीतला दाखवावे तर तो गच्चीवरून कपडे आणण्यासाठी गेला होता. त्यामुळे ते तिथून हालायच्या आतच 'ते काय आहे?' त्याचा छडा आपल्यालाच लावायला लागणार हे मी समजून चुकले. मनाचा ठिय्या करून थोडे आणखी पुढे गेल्यावर ती कोणत्यातरी प्राण्याची शेपटी आहे हे लक्षात आले. सस्पेन्स सस्पेन्स अजून वाढला. तसेच धारिष्ट्य करून आणखी पुढे सरकले. तेवढ्यात तो प्राणी धडपडत खाली घसरला. पुढे वाकून पाहिले तर दोन डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. 'अरे देवा, उंदीर आहे की काय?', कल्पनाच भयंकर होती. डोळे प्राण्यावर खिळलेले. नीट निरखून पाहिले तेव्हा लक्षात आले की ती खार होती. काय करावे सुचेना. माझी हालचाल बंद झालेली पाहून खारीने परत हालचाल सुरु केली आणि ती वर यायचा प्रयत्न करू लागली. तिच्या प्रयत्नांना फळ काही येईना.
हे सगळे घडेपर्यंत अभिजीत खाली आला आणि त्याने खार पाहिली. "घराच्या दारे खिडक्या पूर्ण बंद असताना ही आत आली कुठून?" हा प्रश्न आम्हाला पडला. बहुधा, सकाळी मी निघाल्यावर २ मिनिट दार उघडे होते तेव्हाच ती घरात आली असावी असा निष्कर्ष निघाला.
एव्हाना खार कमोडच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करता करता अर्धमेली झाली. आता मात्र तिला बाहेर काढायला हवे होते. खारीशी अशा पद्धतीने पहिलीच गाठ पडल्याने तिला हातात धरून बाहेर काढायची काही हिम्मत होत नव्हती. तिला काठीने खालून थोडा आधार देऊन वर काढता येईल का ते पाहिले. पण काठीने आधार देऊनही ती घसरतच होती. शेवटी एक फडके कमोडच्या कडेवर ठेवले तेव्हा खारुताई फड़क्यात नखे रुतवून काठावर चढली.
इतके सगळे उपद्व्याप करून खारुताई इतकी दमली की ५ मिनिटे ती तशीच कमोड्च्या काठावर पडून राहिली. मग तिला थोड़ी तरतरी आली आणि तिने टुणकन खाली उडी मारून बाथरूमच्या कोपर्याकडे धाव घेतली. थंडीने आणि भीतीने हुडहुडी भरू लागली. शक्तीच्या अभावी तिला जागचे हलता येईना, तिला अन्नाची गरज होती. "काय द्यावे बरे?" असा विचार करत असतानाच समोर बीट दिसले. बिटाचा तुकडा तिच्यासमोर धरला. तिने अगदी कार्टूनमध्ये दाखवतात तसे दोन हातात धरून तो खायला सुरुवात केली. दोन-तीन बीटाचे तुकडे खाल्ल्यावर तिने २-३ शेंगदाणे खाल्ले. भुकेमुळे खारुताईला "आपण कुठे आहोत? हे अन्न आपल्याला कुठून मिळतेय?" ह्या कशाचीच शुद्ध नव्हती. खाल्ल्यावर तिला जरा तरतरी आली. मग तिने आपले अंग
चाटून स्वछ आणि कोरडे करण्यास सुरुवात केली. अंघोळीचा कार्यक्रम झाल्यावर ती परत थोडी शांत बसली. स्वच्छता मग विश्रांती, परत स्वच्छता परत विश्रांती अशा राउंड्स काही काळासाठी चालू राहिल्या. खारुताई आणखी आणखी तरतरीत दिसू लागली. आधी तिचे आवाजान्कडे लक्ष जात नव्हते, आता ती आवाज ऐकून अंग चोरून बसू लागली, सतर्क वाटू लागली.
तिला तरतरी आलीये म्हणल्यावर आम्ही तिला एकटीला सोडले. कोणी आजूबाजूला नाही असे पाहून ती बाहेर आली. स्वयंपाकघरात शिरली. उंच उंच उड्या मारून ओट्यावर, फ्रिजवर चढायचा प्रयत्न करू लागली. पण ते काही तिला जमले नाही. तेवढ्यात मी स्वयंपाकघरात काम करायला गेले. माझी चाहूल लागताच ती फ्रिजमागे लपून बसली. काही काळाने कुठे गेली म्हणून पाहू लागले तर दिसेना! अभिजीत शोधू लागला. ती गुपचूप दारामागे जाऊन बसली होती. अभिजीतची चाहूल लागताच तिथल्या झाडूवर झाडासारखे चढायचा प्रयत्न करू लागली आणि जमत नाही म्हणल्यावर काही काळ परत शांतपणे बसून राहिली. आम्ही परत आमच्या कामाला लागलो. मग परत धैर्य करून खारुताई देवघरात शिरली. पाहिले तर ती मस्त देवाच्या फोटोमागे अंग चोरून बसली होती.
शेवटी तिला जायला आम्ही हॉलचे दार उघडून ठेवले आणि तिच्या थोडे जवळ जाऊन जरा आवाज केला. आवाजाला घाबरून खारीने दाराच्या दिशेने पळ काढला. दाराबाहेर पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळे वाटले बहुतेक! ती एक मिनिट तिथेच थांबली आणि भिन्तिवरून उडी मारून निघून गेली.
खारुताई २-२.५ तासच आमच्याकडे होती पण तेवढ्या वेळात ती घरभर हिंडली. घरी दोघेच असल्याने ह्या छोट्या आगंतुक पाहुणीचा तेवढ्याच वेळात आम्हाला लळा लागला. गेल्यानंतर बराच वेळ आम्हाला दोघांना ती तिथल्या कोपर्यातच असल्याचा भास होत होता! आमच्या डेली सोपमध्ये "guest appearance" देणारी ही खारूताई कायमची आमच्या आठवणीत राहिलेली आहे.

Sahiye!!!
ReplyDeletekai mast! :)
ReplyDeleteWhat a descriptive narration! I had fun reading it. And I thought it was really sweet of you guys to miss her :-)
ReplyDeleteKetaki
अगदि डोळ्यासमोर घडयत असं वाटत होतं ... मस्त
ReplyDeleteKhoop chan, incidence ani narration, donhi. Routine sodun ashya kahi ghadlelya goshti khoop chan lakshat rahtat he kharach.
ReplyDeleteAsach ekda Piyush, Sanket kade choti manjar adakli hoti akkhi ratra. Sanket la goshta sangayla sangu kadhitari.